Published March 07, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
विविध प्रकारचे पदार्थ चवीचवीने खायला अनेकांना आवडतं.
अनेक मासांहार प्रेमींना वेगवेगळ्या पद्धतीने मासे खायला आवडतात.
मात्र जर तुम्ही दूध आणि मासे एकत्र खात असाल तर याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो.
अनेकांना जेवल्यानंतर लस्सी किंवा थंड दूध पिण्याची सवय असते.
जर तुम्ही नॉनव्हेजमध्ये मासे खात असाल तर त्यावेळी दुधाचे पदार्थ खाणं वर्ज्य केलं पाहिजे.
दूध आणि मासे हे विरुद्ध अन्न आहे, त्यामुळे पचनसंस्थेवर याचा परिणाम होतो असं तज्ज्ञ सांगतात.
दूधाचा गुणधर्म थंड आहे तर मासे हे उष्ण असतात. त्यामुळे थंड आणि गरम याचं एकत्रिकरण होते.
मासे खाल्यानंतर दूध प्यायल्याने किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्याने विविध व्याधी जाणवू लागतात.