जास्त मीठ खाण्याच्या सवयीमुळे होऊ शकतं नुकसान

 मीठ खाणं आवश्यक आहे मात्र ते जास्त प्रमाणात खाणं आरोग्यासाठी वाईट आहे.

जास्त प्रमाणात मीठ खाण्याचे दुष्परिणाम आपण जाणून घेऊयात.

मीठ जास्त खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होऊ शकतात. तसेच उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

मीठ जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वारंवार तहान लागते. वारंवार लघवी होते. कारण मीठामध्ये जास्त प्रमाणात सोडियम असतं.

जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनमुळे वारंवार डोकेदुखी होऊ शकते. यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.

मीठ 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराईडने बनलेले असते. सोडियम आणि क्लोराईड शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्याचे काम करतात. पण जर मिठाचं जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर शरीराला  नुकसान होऊ शकतं.

जास्त मिठाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, किडनीचे आजार, हृदयविकारही होऊ शकतो.

त्यामुळे जेवणात मीठ कमी प्रमाणात वापरायला हवं, हे लक्षात ठेवा.