झोप ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची असते. मात्र पृथ्वीवर असेही प्राणी आहेत जे जिवंतपणी कधीच झोपत नाहीत.
मुंग्या आयुष्यात कधीही झोपत नाहीत.
जेलीफिश कधीही झोपत नाही. फक्त विश्रांतीसाठी ते शरीराला पाण्यात मोकळं सोडतात.
फुलपाखरे कधीही झोपत नाहीत, ते स्वतःला एकाच जागी ठेवून विश्रांती घेतात. त्यावेळी शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके कमी होतात.
शार्कला ऑक्सिजनची गरज असून तो पाण्यात तरंगतो. पण तो झोपत नाही.
जिराफ हा प्राणी झोपत नाही असं म्हणतात कारण तो बसल्यावर किंवा उभं असताना असं झोपतो की तो झोपलाय हे कळतच नाही.
घोडे उभ्या उभ्या शरीराला आराम देतात त्यामुळे ते झोपलेत हे कुणाला कळत नाही.
व्हेल मासा आराम करायचा असेल तर शरीराला पाण्यात मोकळं सोडतो.
डॉल्फिन जेव्हा झोपतो तेव्हा त्याच्या मेंदूचा एक भाग सक्रिय असतो. त्यामुळे तो झोपतो असं म्हणता येणार नाही.