ईशा गुप्ता ट्रॅडिशनल लूकमुळे झाली ट्रोल

Photo credit -egupta@instagram

ईशा गुप्ता नेहमी आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.त्यावरून तिच्यावर अनेकदा टीकाही केली जाते.

मात्र यावेळी ईशाला ट्रॅडिशनल लूकमुळे ट्रोल केलं जातंय.

ईशाने जांभळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमधले काही फोटो शेअर केले आहेत.

वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलंय.

तिने जे रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले आहेत त्यातही तिने ट्रॅडिशनल पंजाबी ड्रेस घातलाय.

तिच्या भावांसोबतचे फोटो तिने शेअर केले आहेत.

नेहमी बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणाऱ्या ईशाचा हा पारंपरिक लूक पाहून नेटकऱ्यांनी धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

काहींनी तिचं कौतुक केलंय.

दुसरीकडे काहींनी ‘मी जे बघतोय ते खरं आहे का? मी आंधळा तर झालो नाही ना ?’ अशा आशयाच्या कमेंट केल्यात.