अवघ्या 30 लोकांचा देश, येथे कुत्र्यांनाही मिळतेय नागरिकत्व

अमेरिकेतील नेवाडाजवळ स्थित आहे 'रिपब्लिक ऑफ मोलोसिया' (Republic of Molossia) , येथील लोकसंख्या अवघ्या 30 लोकांची आहे.

विशेष म्हणजे येथे कुत्र्यांनाही नागरिकत्व दिले जाते.

हा अमेरिकेतील नेवाडाजवळ स्थित एक छोटासा देश आहे, याची सीमा एकूण 2.28 एकर जमिनीने व्यापलेली आहे. केविन बाघ हा इथला हुकूमशहा आहे.

हुकूमशहा केविन बाघ यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. ही व्यक्ती नेहमी लष्करी पोशाखात असते.

इतर देशांप्रमाणेच या देशाला स्टोअर्स, लायब्ररी, पोस्ट ऑफिस, स्मशानभूमी याशिवाय स्वतःचा कायदा, परंपरा आणि चलनही आहे.

नेवाडाच्या डेटन व्हॅलीमध्ये असलेल्या या मायक्रोनेशनमध्ये Valora नावाचे वेगळे चलन देखील आहे. ही प्रणाली चालवण्यासाठी Bank of Molossia, चीप असलेली नाणी आणि छापील नोटा देखील आहेत.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, लोक मोलोसिया देशाला ओळखतात आणि भेट देतात. येथे येण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या पासपोर्टवर शिक्का मारावा लागतो.

या देशाला भेट देण्यासाठी पर्यटकांना फक्त 2 तास मिळतात. या ट्रिपमध्ये केविन स्वत: पर्यटकांना देशातील इमारती आणि रस्ते दाखवतो.

रिपब्लिक ऑफ मोलोसियानेही दोनदा राष्ट्रगीत बदलले आहे. त्याचा ध्वज निळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या तिरंगा डिझाइनमध्ये आहे.