पावसाळ्यात अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या ‘आय फ्लू’ भारतात वेगाने पसरतोय.
‘आय फ्लू’ची लक्षणं काय आहेत आणि आय फ्लूपासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊयात.
डोळे लाल होणं, डोळ्यांना सूज येणं, खाज किंवा जळजळ होणं, डोळ्यातून पाणी होणं, प्रकाशाचा त्रास होणं ही ‘आय फ्लू ’ची लक्षणं आहेत.
‘आय फ्लू’पासून बचाव होण्यासाठी काही साधे उपाय तुम्ही करू शकता.
‘आय फ्लू’ पासून बचाव करण्यासाठी हाताची स्वच्छता ठेवा. हात वारंवार धुवा.
कारण डोळ्यांचा संसर्ग घाणेरड्या हातांमुळे पसरतो.
डोळ्यांच्या मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांशी शेअर करणं टाळा.
तुमचा टॉवेल दुसऱ्यांना वापरायला देऊ नका. तसेच टॉवेल वारंवार धुवा. स्वच्छ कपडे वापरा.
डोळ्यांसाठीचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स कालबाह्य झाल्यानंतर वापरू नका.
उशांची कव्हर्स वारंवार बदला.
आय फ्लू झालेल्या लोकांपासून लांब राहा.