Published Marach 24, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
नुकतंच आयपीएलच्या १८व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली. या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटीची मांदियाळी पाहायला मिळाली.
या सोहळ्यामध्ये बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने ही उपस्थिती लावली होती.
श्रेया घोषालने आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
अभिनेत्रीने या सोहळ्यादरम्यान खास लूक वेअर केला होता. त्या दरम्यानचे तिने इन्स्टाग्रामवर खास फोटोज शेअर केले आहेत.
कायमच श्रेया इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर केला होता. त्या लूकमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत आहे.
कायमच आपल्या गाण्यामुळे चर्चेत राहणारी श्रेया सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.