पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. तिचा उपयोग कशाप्रकारे करावा ते जाणून घ्या.
चुकीची जीवनशैली आणि अनहेल्दी पदार्थांमुळे सध्या लठ्ठपणाच्या
समस्येने बहुतेक जणांना ग्रासलेलं आहे.
बडीशेपचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करून पोटावरील चरबी कमी करा.
बडीशेपमुळे पोट भरलेलं राहतं. त्यामुळे कमी कॅलरीज खाल्ल्या जातात. वजन कमी व्हायलाही मदत होते.
बडीशेपमध्ये भरपूर पोषकतत्व असतात, कॅलरीचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे बॉडी फॅट कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी बडीशेप अतिशय उपयुक्त आहे.
बडीशेपमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट विषारी पदार्थ काढून टाकतात. जे वजन संतुलित ठेवण्यास मदत करते.
बडीशेप रिकाम्या पोटी खाल्ल्यास वजन कमी करण्यात खूप उपयोग होतो
.
बडीशेपेच्या बिया उकळवू नका, त्यामुळे त्यातील गुणधर्म नष्ट होऊ शकतात.