पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी Life Certificate जमा करणे आवश्यक असते. यासाठी Face Authentication आणि Fingerprint Authentication हे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
Picture Credit:pinterest
या पद्धतीत पेन्शनधारकाच्या बोटांचे ठसे स्कॅन केले जातात. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या बायोमेट्रिक माहितीशी त्यांची पडताळणी होते.
Picture Credit:pinterest
या तंत्रज्ञानात स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याद्वारे चेहऱ्याचा फोटो घेतला जातो. त्यानंतर आधार डेटाच्या मदतीने व्यक्तीची डिजिटल पडताळणी केली जाते.
Picture Credit:pinterest
– बोटांच्या ठशांद्वारे ओळख पटवता येते. – प्रक्रिया जलद होते. – ठसे स्पष्ट असल्यास सहज प्रमाणीकरण होते. – बायोमेट्रिक स्कॅनरची आवश्यकता असते.
Picture Credit:pinterest
– स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने पडताळणी. – वेगळ्या फिंगरप्रिंट स्कॅनरची गरज नाही. – घरबसल्या Life Certificate तयार करता येते. – ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर पर्याय.
Picture Credit:pinterest
वाढत्या वयामुळे काही ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे अस्पष्ट होतात. अशा वेळी Fingerprint Authentication अयशस्वी होऊ शकते. Face Authentication हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
Picture Credit:pinterest
Fingerprint Authentication साठी बायोमेट्रिक स्कॅनर आणि संबंधित सेवा आवश्यक असते. Face Authentication साठी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, Aadhaar Face RD App आणि Jeevan Pramaan App आवश्यक असतात.
Picture Credit:pinterest
दोन्ही पद्धतींमध्ये आधारद्वारे ओळख पडताळली जाते. मात्र, Face Authentication मध्ये चेहऱ्याचा तर Fingerprint Authentication मध्ये बोटांच्या ठशांचा वापर होतो. फेस ऑथेंटिकेशनसाठी स्मार्टफोन पुरेसा ठरतो, तर फिंगरप्रिंटसाठी स्कॅनर आवश्यक असतो.
Picture Credit:pinterest
दोन्ही पद्धती उपयुक्त आहेत. मात्र, बोटांचे ठसे अस्पष्ट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी Face Authentication अधिक सोयीचे ठरू शकते. स्मार्टफोनच्या मदतीने घरबसल्या Life Certificate जमा करता येते.
Picture Credit:pinterest