Published On 22 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
आनंद निर्देशांक 2025 यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत फिनलंड अव्वल ठरला आहे.
फिनलंड पुन्हा एकदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
फिनलंडला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून घोषित करण्याचे हे सलग आठवे वर्ष आहे.
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये फिनलंडला 10 पैकी 7.736 गुण देण्यात आले आहेत.
फिनलंडनंतर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आनंदी देश डेन्मार्क आहे.
यानंतर आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड्सचा क्रमांक लागतो.
फिनलंडचा निसर्गाशी जवळचा संबंध आहे आणि एक मजबूत कल्याणकारी व्यवस्था आहे.
येथील लोक आनंदी असण्याचे हेच सर्वात मोठे कारण आहे.