₹6.42 कोटींचं नवं घर अन् ₹1.12 कोटींचा जुना फ्लॅट; प्राजक्ताची डील चर्चेत!

Lifestyle

21 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आधी खरेदी, मग विक्री!

प्राजक्ता माळीने ऑगस्टमध्ये मुंबईतील गोरेगावमध्ये नवं घर खरेदी केलं. त्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत तिच्या जुन्या घराची विक्री झाली.

Picture Credit: Pinterest

नवं घर कितीला घेतलं?

12 ऑगस्ट 2026 रोजी प्राजक्ताने गोरेगावमधील Oberoi Exquisiteमध्ये सुमारे 996 sq ft कार्पेट एरियाचं घर खरेदी केल्याची माहिती आहे. किंमत: ₹6.42 कोटी.

Picture Credit: Pinterest

नव्या घराची किंमत ऐकून धक्का बसेल!

नोंदणीकृत व्यवहारानुसार नव्या घराची किंमत जवळपास ₹64,500 प्रति sq ft इतकी असल्याचं रिपोर्ट्समध्ये नमूद आहे. घरासोबत कार पार्किंगची सुविधाही आहे.

Picture Credit: Pinterest

घरासाठी घेतलं मोठं कर्ज

रिपोर्ट्सनुसार, या घराच्या खरेदीसाठी प्राजक्ताने ₹5.78 कोटींचं Housing Loan घेतलं आहे. हे कर्ज Indian Bankकडून घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Picture Credit: Pinterest

मग जुन्या घराचं काय झालं?

नवं घर घेतल्यानंतर प्राजक्ताने गोरेगाव ईस्टमधील आपला 473 sq ft जुना फ्लॅट विकला. या विक्रीची नोंद 10 सप्टेंबर 2026 रोजी झाली.

Picture Credit: Pinterest

जुना फ्लॅट कितीला विकला?

या 473 sq ft फ्लॅटचा व्यवहार तब्बल ₹1.12 कोटींना झाल्याची माहिती आहे. या व्यवहारासाठी प्राजक्ताने सुमारे ₹6.73 लाख स्टॅम्प ड्युटी भरल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

Picture Credit: Pinterest

एका महिन्यात नेमकं काय घडलं?

12 ऑगस्ट: ₹6.42 कोटींचं नवं घर खरेदी 10 सप्टेंबर: ₹1.12 कोटींचा जुना फ्लॅट विकला म्हणजेच, दोन्ही व्यवहारांमध्ये साधारण एक महिन्याचाच फरक आहे.

Picture Credit: Pinterest

घर बदलण्यामागचं कारण काय?

नवं घर घेतल्यानंतर जुना फ्लॅट विकण्यामागचं नेमकं कारण प्राजक्ताने सार्वजनिकरित्या सांगितलेलं नाही. मात्र, 473 sq ftच्या जुन्या घरातून 996 sq ftच्या नव्या घराकडे झालेला हा बदल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Picture Credit: Pinterest