‘जेलर’ चित्रपटामध्ये पाच सुपरस्टार आले एकत्र
दोन वर्षांनंतर सुपरस्टार रजनीकांत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे ‘जेलर’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.
मात्र रजनीकांतसोबत आणखी चार सुपरस्टार्स ‘जेलर’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
भारतातल्या तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी या पाच चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ‘जेलर’मध्ये एकत्र दिसले आहेत.
रजनीकांत हे तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आहेत. 'जेलर' मध्ये त्यांनी मुथुवेल पंडियनची भूमिका साकारली आहे.
शिवा राजकुमार यांनी अनेक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'जेलर'च्या माध्यमातून ते तमिळमध्ये पदार्पण करत आहेत.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल या चित्रपटात खास कॅमिओ साकारत आहेत.
तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेते सुनिल यांचाही रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या थ्रिलर चित्रपटामध्ये महत्त्वाचा रोल आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते जॅकी श्रॉफ हेदेखील ‘जेलर’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
पाच भाषांमधले सुपरस्टार एकत्र आल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने पॅन इंडिया चित्रपट आहे, असं म्हणावं लागेल.