डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी संत्र्याचा रस फायदेशीर ठरतो.
संत्र हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे. हा रस प्यायल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो.
गाजरात व्हिटॅमिन ए असल्याने रातांधळेपणाची समस्या दूर होते. बीटामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. हे मॅक्युलर आणि रेटिना आरोग्यासाठी चांगलं आहे.
सफरचंदांमध्ये बायोफ्लेव्होनॉइड्स असतात. बायोफ्लाव्होनॉइड्स दृष्टी सुधारतात असे मानले जाते.
हिरव्या पालेभाज्या अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असल्याने यामुळे दृष्टी चांगली राहते. यातील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हानिकारक किरणांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.
टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम अशा पोषक तत्वांमुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे घटकदेखील आढळतात. हे महत्त्वाचे अँटिऑक्सिडेंट आहेत.
नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक खनिजांसह अमीनो ॲसिड असते.
नारळाच्या पाण्याचे दररोज सेवन केल्यास डोळ्यांचा त्रास कमी होतो.