गुगगले फ्लॅट व्हाईट कॉफीचे डुडल बनवले.

गरमागरम दूध आणि एस्प्रेसोसोबत मायक्रोफोमचा वापर करून ही कॉफी बनवतात.

11 मार्च जगात फ्लॅट व्हाईट कॉफी डे म्हणून साजरा करतात.

1980 च्या दशकात सिडनी आणि ऑकलंडमध्ये पहिल्यांदा कॉफी मेन्यूवर दिसली

कमी फोम आवडणाऱ्यांसाठी फ्लॅट कॉफी हा उत्तम पर्याय असू शकतो.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील लोकांना ही कॉफी खूप आवडते.

एस्प्रेसो कॉफी एका कपमध्ये घ्यायची, गरमागरम दूध वरून घालायचं, चमच्याने फेस बाजूला करायचा.

नंतर त्यावर मायक्रोफोमचा पातळ थर टाकायचा, फ्लॅट व्हाईट कॉफी तयार.