अनेकजण बाहेरून सांबर मसाला खरेदी करत असतात.
मात्र हा सांबर मसाला तुम्ही घरीदेखील बनवू शकता
यासाठी एका कढईत 1 चमचे धने आणि 2 चमचे जिरे टाकून परतून घ्या
मग यात 1 चमचे मेथी दाणे आणि मोहरी टाकून परतून घ्या
आता यात 2 चमचे चणा डाळ आणि उडीद डाळ परतून घ्या
आता या कोरड्या पॅनमध्ये 10-12 सुक्या लाल मिरच्या परतून घ्या
त्याच पॅनमध्ये तांदूळ मंद आचेवर परतून घ्या
नंतर यात 10-12 कढीपत्त्याची पाने कोरड्या भाजून घ्या
आता हे सर्व सामान मिक्सरमध्ये हळद आणि हिंग घालून वाटून घ्या
तुमचा घरगुती सांबर मसाला तयार होईल