भारतातल्या ‘या’ 5 महिलांचं Forbes च्या यादीत झळकलं नाव

फोर्ब्सने भारतातील टॉप-100 श्रीमंतांच्या यादीत 9 महिलांना स्थान दिलं आहे. देशातल्या सगळ्यात श्रीमंत अशा 5 महिलांविषयी जाणून घेऊयात.

 श्रीमंत महिलांच्या यादीत जिंदाल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदाल यांचं नाव सगळ्यात वर आहे. त्यांची एकूण संपत्ती 24 अरब डॉलर आहे.

श्रीमंत भारतीय महिलांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला.

श्रीमंत भारतीयांच्या यादीत रेखा या 28 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण नेट वर्थ 7 अरब डॉलर आहे.

Havells India चे एमडी अनिल गुप्ता यांची आई विनोद गुप्ता भारतातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत.

विनोद यांची एकूण संपत्ती 6.7 अरब डॉलरच्या आसपास आहे.

Landmark Group च्या चेअरमन आणि सीईओ रेणुका गुप्ता यांची संपत्ती 4.8 अरब डॉलर आहे.

रेणुका श्रीमंत भारतीय महिलांच्या लिस्टमध्ये चौथ्या स्थानी आहेत.

यूएसवी इंडिया फार्मा कंपनीच्या चेअरमन लीना तिवारी भारतातल्या श्रीमंत महिलांमध्ये पाचव्या स्थानावर आहेत.त्यांची नेटवर्थ 4.75 अरब डॉलर आहे.