द मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा 'द मार्व्हल्स' दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यात 3 महिलांची शक्ती बघायला मिळणार आहे.
‘द मार्व्हल्स’च्या निमित्ताने 2023 या वर्षात नारीशक्तीचं दर्शन घडवणारे कोणते चित्रपट आले ते जाणून घेऊयात.
‘बार्बी’ चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित झाला. मारगॉट रॉबी आणि रायन गॉसलिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात महिलांचा प्रभाव जाणवतो.
‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट 29 जूनला प्रदर्शित झाला. यात कियारा वेगळ्या महिलेच्या दमदार भूमिकेत दिसली.
राणी मुखर्जी ही वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते.
‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा 17 मार्चला रिलीज झालेला राणीचा चित्रपट एका आईच्या संघर्षाची कथा मांडणारा आहे.
25 जानेवारीला रिलीज झालेल्या ‘पठाण’ चित्रपटात दिपिकाने रुबिना या अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारली होती.
‘पठाण’ चित्रपटात रुबिना हे पात्र खूप महत्त्वाचं होतं.
‘द मार्व्हल्स’ चित्रपटामध्ये कॅप्टन मार्व्हल (ब्री लार्सन), मिस मार्व्हल ( इमान वेलानी) आणि मोनिका रॅम्ब्यू (टेयोना पॅरीस) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तिघींकडे वेगळी शक्ती आहे.
सुपरवुमनच्या सुपर पॉवर दाखवणाऱ्या ‘द मार्व्हल्स’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.