सनी देओलचा 'गदर 2' आठवडाभरातच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
गदर 2 च्या यशानंतर आता सनी देओल बॉर्डर 2 मध्ये दिसणार आहे.
'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात येणार आहे.
चित्रपट निर्माते जेपी दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता सिनेमाचा सिक्वेल बनवणार आहे.
अजून सिनेमाची ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाही.
सनी देओलव्यतीरिक्त संपूर्ण नवीन स्टारकास्ट सिनेमात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
या आधीच्या बॉर्डर सिनेमात जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, सुदेश बेरी, पुनीत इस्सर, कुलभूषण खरबंदा
बॉर्डर सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला होता.
जेपी दत्ता यांना बेस्ट दिग्दर्शक, जावेद अख्तर यांना राष्ट्रीय पुरस्कार गीतकार म्हणून देण्यात आला होता.