गदर 2 ने सलग दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवला आहे.
सिनेमा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी थिएटरबाहेर दिसत आहे.
गदर एक प्रेम कथा पुन्हा हिट ठरत आहे.
सनी देओलच्या सिनेमाचे अनेक शो हाऊसफुल्ल आहेत.
तारा सिंह आणि सकीनाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, सिनेमाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे.
शनिवारी गदर 2 चे कलेक्शन सुमारे 45 कोटी रुपये होते.
या सिनेमाने पहिल्या दिवशी 40.10 कोटींची कमाई केली होती.
दोन दिवसांत चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा सुमारे 85 कोटींवर पोहोचला आहे.
रविवारी सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.