गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.

गणरायाच्या आगमनाच्या तयारीची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे.

डेकोरेशन, सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठाही सजल्या आहेत. 

गणरायाच्या मखराप्रमाणेच गौरींसाठीही खास दागिने बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

अगदी 150 रुपयांपासून 1200 रुपयांपर्यंत दागिने आहेत. 

टेम्पल ज्वेलरी, गौराईचा संपूर्ण साजही उपलब्ध आहे. 

मोत्याच्या दागिन्यांमध्ये चिंचपेटी, तन्मणी, झुमके, तोडे, बिंदी, नथ, मंगळसूत्र  आहे.

तर राणीहार आणि कोल्हापुरी साजही तुमच्या गौरींसाठी तुम्ही घेऊ शकता.