गणपती बाप्पाला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा

Life style

29 August, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

गणपती बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा, जाणून घ्या

गणेश चतुर्थी 2025

गणपती बाप्पाचा सर्वांत जास्त आवडीचा पदार्थ. हे तांदळाच्या पिठापासून गव्हाच्या पिठापासून बनवले जाते आणि त्यात नारळ आणि गूळ भरलेले असतात.

मोदकाचा नैवेद्य

बेसन, रवा आणि नारळाने बनलेला लाडू गणेशोत्सवामध्ये बनवा. लाडूचा नैवेद्य दाखवल्याने करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते असे म्हटले जाते.

लाडूचा नैवेद्य

नारळाची मिठाई

नारळाची बर्फी गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे आणि ती अर्पण केल्याने ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते.

पुरणपोळीचा नैवेद्य

गणपती बाप्पाचा आजून एक आवडता पदार्थ पुरणपोळी. याचा नैवेद्य दाखवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असे म्हटले जाते.

साबुदाण्याची खीर

साबुदाण्याची खीर गणपती बाप्पाला खूप आवडते. याचा नैवेद्य दाखवल्याने घरामध्ये सुख शांती नांदते आणि मानसिक शांती मिळते.

फळांचा नैवेद्य

गणपती बाप्पाला फळांचा नैवेद्य दाखवला जाऊ शकतो. सफरचंद, केळ इत्यादी. यामुळे फळांचा नैवेद्य दाखवल्याने आरोग्य चांगले राहते.

पंचमेवा अर्पण करा

पंचमेवा गणपती बाप्पाला खूप आवडतो. याचा नैवेद्य दाखवल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि दुःख आणि अडथळे दूर होतात