भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. 

गणेश चतुर्थीपासून महाभारताचं कार्य सुरू झाल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. 

महाभारताची रचना करण्यास महर्षी वेद व्यासांनी गणपतीला सांगितल्याचं म्हटलं जातं. 

महाभारताचं लिखाण करताना 'आता माझी लेखणी थांबणार नाही' असं म्हणत लिहायला सुरुवात केली होती. 

 गणरायाने सलग 10 दिवस महाभारताचं लिखाण केलं.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारताचं लिखाण पूर्ण झाल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी बाप्पाचं शरीर स्थिर झालं होतं 

सलग 10 दिवस हालचाल न केल्याने बाप्पाच्या अंगावर धूळ, माती होती. 

 सरस्वती नदीत आंघोळ करत बाप्पाने अंग स्वच्छ केलं 

त्यामुळे 10 दिवस विधिवत पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं जातं.