19 सप्टेंबर 2023 पासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.
चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
सकाळी 11.07 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यत आहे.
घरोघरी बाप्पांची स्थापना केली जाते. सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी रवियोग, स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांचा संयोग आहे.
घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करत असाल तर बाप्पाच्या मूर्तीच्या इथे अंधार करू नका.
गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
अनंत चतुर्दशी येत्या 28 सप्टेंबरला असणार आहे.