मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची असते गर्दी
मुंबईतील लालबाग मार्केट जीडी गोयनका परिसरात लालबागच्या राजाची 1934 पासून स्थापना केली जाते.
चिंचपोकळीतील दत्ताराम लाड मार्गावर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणपती प्रसिद्ध आहे.
या गणपतीची 1920 या वर्षी स्थापना करण्यात आली.
ग्रँट रोड, खंबाळा लेनमध्ये ‘खेतवाडीचा राजा’ नावाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. या गणपतीच्या मुर्तीचा आकार 1959 पासून एकच ठेवण्यात आला आहे.
फोर्ट येथील कबूतरखान्याजवळ 1982 सालापासून ‘फोर्ट इच्छापूर्ती गणेश’हा गणपती बसवला जातो.
वडाळा येथे जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीची स्थापना 1955 पासून केली जाते.
गिरगावमध्ये एसवी सोवानी रस्त्यावर ‘गिरगांवचा राजा’1928 पासून दरवर्षी गणेश चतुर्थीला विराजमान होत असतो.
वीरा देसाई रोडवर 1996 पासून दरवर्षी ‘अंधेरीचा राजा’गणपतीची स्थापना केली जाते.