गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झालीय. 

गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. 

 काही दिवसांवर सार्वजनिक गणेशोत्सव आल्याने मोठ्या मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत. 

वाजतगाजत, मिरवणुका काढत लाडक्या गणरायाला मंडपाकडे नेण्यात येत आहे.

 रस्त्यावर गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. 

मुंबईत 12 हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तर 1 लाख 90 हजार घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. 

 शनिवार, रविवारी मोठ्या गणपतींचं आगमन होणार असल्याने लालबाग, परळ परिसरात गर्दी पाहायला मिळणार आहे.