लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे.
बाप्पाला विराजमान होण्यासाठी या तयारीतलं सगळ्या महत्त्वाचं म्हणजे मखर
सध्या पर्यावरणाचा विचार करत इको फ्रेण्डली मखराचा ट्रेण्ड वाढलाय.
यासाठी बाजारपेठाही सजल्या आहेत, खूप ऑप्शन्स आहेत.
तुमच्या घरातल्या जागेनुसार तुम्ही इको फ्रेण्डली मखर निवडू शकता.
नो प्लास्टिक, नो थर्माकॉल असं म्हणत इको फ्रेण्डली मखर बनवण्यात आले आहेत.
काही ठिकाणी फोम शीटला कागदी, कापडी फुलं लावण्यात आलेली आहेत.
कमीत कमी किमतीत हे मखर उपलब्ध आहेत.