बाप्पाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक राहिलेत, सगळ्यांनी खरेदीला सुरुवात केली आहे. 

बाजारपेठा सजल्या आहेत, सजावटीसाठी नवनवीन साहित्य बाजारात आलं आहे.

 गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळत आहेत.

आपल्या बाप्पाची मूर्ती सुंदर, आकर्षक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

 पर्यावरणपूरक मूर्ती, इको फ्रेण्डली मूर्ती, बालगणेशाला पसंती मिळत आहे. 

 बालगणेशाचं हे रुप भाविकांसाठी पर्वणीच आहे.

. कुठे हसरा बाप्पा, तर कुठे निवांत बसलेल्या बाप्पाची मूर्ती दिसत आहे. 

अशा या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आता साऱ्यांनाच आतुरता आहे.