आज आम्ही तुम्हाला देशातल्या एका अनोख्या गावाबद्दल सांगणार आहोत
.
त्या गावात एक नाही, दोन नाही तर प्रत्येक घरात जुळी मुलं आहेत.
हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, हे कसं शक्य आहे असंही मनात आलं असेलच.
मीडिया रिपोर्टनुसार 2000 घरांमध्ये 550 जुळी मुलं आहेत.
या गावातल्या घरांमध्ये जुळी बाळंच जन्माला येतात.
केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील हे एक गाव आहे. या गावाचं नाव आहे कोडिन्ही.
या गावात सगळ्यात जास्त जुळी मुलं आहेत.
अधिकृत आकड्यांनुसार 2008 मध्ये या गावात 280 जुळी बाळं होती.