धक्कादायक! जर्मन बॉडीबिल्डर जो लिंडर यांचे निधन, वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध बॉडीबिल्डिंग यूट्यूब स्टार जो लिंडर यांचे निधन झाले.
'जोइस्थेटिक्स' या नावाने प्रसिद्ध असलेल्या जो लिंडर यांनी वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
जो लिंडरने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले होते.
जो लिंडरच्या मृत्यूला त्याची मैत्रीण निचा हिने दुजोरा दिला.
निचाने सांगितले की, जो लिंडरची तीन दिवसांपासून मान दुखत होती.
निचाच्या म्हणण्यानुसार, लिंडरच्या मृत्यूचे कारण 'एन्युरिझम' होतं.
निचाने जो लिंडरसाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.
जो लिंडरचे इंस्टाग्रामवर 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवर 941,000 हून अधिक सदस्य आहेत.