आहारतज्ञांच्या मते सकाळी अनशेपोटी एक चमचा तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे आपण जाणून घेऊयात.
रिकाम्या पोटी सकाळी तुपाचं सेवन केल्यास आतड्याची शोषण क्षमता सुधारते. शरीरातील आम्ल कमी होते.
सकाळी रिकाम्या पोटी तुपाचं सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे केस व त्वचेला चमक मिळते.
बद्धकोष्ठता आणि मूळव्याध अशा शौचाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
तुपाचं सेवन केल्यामुळे भूक शांत होते आणि वजन नियंत्रणात राहतं.
तुपाचं सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. लहान मुलांना तूप खाऊ घालणं फायदेशीर आहे.
तुपातील ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे शरीरातील घातक फॅट्स बाहेर पडून वजन कमी होण्यास मदत होते.
तुपामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहात असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारतं.