अनेकांच्या सकाळची सुरुवात ही चहाने होत असते
सध्या चहामध्ये तूप टाकून पिण्याचा नवीन ट्रेंड सुरू आहे
मात्र चहामध्ये तूप टाकून पिणे आरोग्यासाठी खरचं फायदेशीर आहे का?
तुपात अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीराला डीटाॅक्स करण्यास मदत करतात
हे सुपरफूड पोषक घटकांचं शोषण वाढवते आणि पोटातील PH संतुलित करण्यास मदत करते
कधीकधी सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने ऍसिडिटी होऊ शकते
तूप आम्लीय पदार्थांचा प्रतिकार करते, ज्यामुळे जळजळ आणि अपचनाचा त्रास कमी होतो
चहामध्ये तूप टाकून प्यायल्याने पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते, असे तज्ञांचे म्हणणे आहे