देशभरात दिसला बाळगोपाळांचा गोकुळाष्टमीचा उत्साह

All Photos Credit -PTI

देशभरात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला.

सुदर्शन पटनायक यांनी वाळूवर कृष्णाची आकृती साकारून जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

मोठ्यांसोबत चिमुकलेही गोकुळाष्टमी साजरी करण्यात रमले होते.

कृष्णाच्या अवतारात अनेक ठिकाणी बाळगोपाळांनी दहीहंडी फोडली.

शाळांमध्येही हा सण साजरा करण्यात आला.

अनेक मुलांनी कृष्णाची वेशभूषा केली होती.

बाळगोपाळांना सजवण्यात पालकांनीही उत्साह दाखवला.

संपूर्ण देश कृष्णमय झाल्यासारखं चित्र दिसलं.