अक्षय्य तृतीया साडे तीन मुहूर्तांपैकी एक. आजच्या दिवसाला सोनं खरेदीला महत्त्व दिलं जातं.
आज देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,150 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,050 रुपये इतकी आहे.
कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात वाढ किंवा घसरण झालेली नाही.
एक किलो चांदीची किंमत 76.900 रुपये इतकी आहे. काल चांदीचा भाव 77,600 रुपये प्रति किलो होता.
कालच्या तुलनेत आज चांदी 700 रुपयांनी स्वस्त झालेली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदीचा विचार करायला हरकत नाही.