गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मंदीच्या भीतीने सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत.
संकटाच्यावेळी काही उपयोगी येत असेल तर ते म्हणजे सोनं, त्यामुळे जगातील जवळपास सर्वच देश सोन्याचा साठा करतात.
प्रत्येक देशाची सेंट्रल बँक सोन्याची साठवणूक करते. सोन्याचा उपयोग हेज फंड म्हणून केला जातो.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ट्विटरवर जगभरातील देशांच्या सोन्याच्या साठ्याची यादी जाहीर केली आहे.
आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. ८,१३३ मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.
अमेरिकेपाठोपाठ सोन्याचा मोठा साठा जर्मनीकडे आहे. त्यात ३,३५५ मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.
इटली 2,452 मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यासह तिसऱ्या तर फ्रान्स 2,299 मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यासह चौथ्या क्रमांकावर आहे.
चीनकडे 2,011 टन सोन्याचा साठा आहे. स्वित्झर्लंडकडे 1,040 टन आणि जपानकडे 846 टन सोन्याचा साठा आहे.
या यादीत भारत नवव्या क्रमांकावर आहे. भारताकडे 787 टन सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्याचे हे प्रमाण सतत चढ-उतार होत असते.
या
यादीत भारतानंतर नेदरलँड, तुर्की, सौदी अरेबिया, यूके, स्पेन, पोलंड, सिंगापूर, ब्राझील आणि स्वीडन यांचा समावेश आहे.