लहान मुलांना लावा ‘या’ चांगल्या सवयी
लहान मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.तसेच दिवसभराचं वेळापत्रक पाळण्याची सवय लावा.
घरातली मुलांना जमतील अशी छोटी- छोटी कामं करायला द्या.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
देवाची प्रार्थना, पूजा करायला सांगा आणि देवाने दिलेल्या गोष्टीबद्दल आभार मानायला शिकवा. यामुळे नम्रता आणि आदराची भावना निर्माण होते.
मोठ्यांचा आदर करण्याची,त्यांना नमस्कार करण्याची सवय मुलांना लावा.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय मुलांना लावा. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर पडतात.मुलांचा उत्साह टिकून राहण्यासाठी मदत होते.
लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना खेळण्याची, इतरांसोबत बोलण्याची सवय लावा.
लहान मुलांना व्यायामाची सवय लावली तर ते निरोगी राहतात. त्यामुळे त्यांना व्यायाम करायला लावा.
मुलांना वाचनाची सवय लावा. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
त्यांना पौष्टिक आणि योग्य आहाराचं महत्त्व समजावून सांगा म्हणजे ते आवडीने जेवतील.