घरची आर्थिक समस्या दूर होण्याचे अनेक संकेत मिळतात.
घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या तर हा शुभ संकेत आहे.
काळ्या मुंग्या घरात येणं हा लक्ष्मी घरी येण्याचा संकेत असल्याचं मानलं जातं.
घराच्या बाल्कनीत, अंगणातील झाडामध्ये कोणत्याही पक्ष्याचे घरटे असेल तर ते शुभ लक्षण आहे.
घरात एकाच ठिकाणी 3 पाली एकत्र दिसल्यास पैसे घरात येण्याचा संकेत मानतात.
उजव्या तळहाताला खाज सुटत असेल तर हासुद्धा पैसा घरात येण्याचा शुभ संकेत मानला जातो.
जर तुम्हाला स्वप्नात झाडू, घुबड,हत्ती, मुंगूस, सरडा, तारा, नाग किंवा गुलाबाचे फूल दिसले तर ते शुभ चिन्ह आहे.
सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखनाद ऐकायला आल्यास ते शुभ असतं.
सकाळी घरातून बाहेर पडताना खूप दिवसांपासून तुम्ही कोणाला कचरा काढताना पाहात असाल तर शुभ मानतात.