शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही- अनिल देशमुख
केंद्र आणि राज्य सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्य सरकारने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली.
मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
ते नागपुरात प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
येत्या 3 आणि 4 जूनला नागपुरात राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात आयोजन नागपुरात करण्यात आले आहे.
यासाठी तीन तारखेला उद्घाटन समारंभात अजितदादा पवार उपस्थित असणार आहेत.
तर 4 जून रोजी समारोपाला राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असणार आहेत.
दोन दिवस सुमारे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते या ओबीसी शिबिरात सहभाग घेणार असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.