दिल्लीत Hyundai ने 120kW DC फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. EV चार्जिंगचा वेळ कमी करण्याच्या दिशेने कंपनीचं हे मोठं पाऊल आहे.
Picture Credit:hyundai
नवी दिल्लीतील विविध ठिकाणी हे फास्ट चार्जर बसवण्यात आले आहेत. या चार्जिंग स्टेशनची उभारणी Statiq सोबतच्या भागीदारीत करण्यात आली आहे.
Picture Credit:hyundai
Hyundai च्या myHyundai App वरून चार्जिंग स्टेशन शोधता येणार आहे. नेव्हिगेशन, बुकिंग आणि डिजिटल पेमेंटची सुविधाही उपलब्ध आहे.
Picture Credit:hyundai
Hyundai कडे सध्या 105 शहरांमध्ये 185 DC फास्ट चार्जिंग स्टेशन आहेत. कंपनीचं नेटवर्क आता आणखी मोठं करण्याची योजना आहे.
Picture Credit:hyundai
Hyundai ने 2030 पर्यंत स्वतःचं DC फास्ट चार्जिंग नेटवर्क 600 स्टेशनपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
Picture Credit:hyundai
myHyundai App द्वारे Hyundai ग्राहकांना विविध Charge Point Operatorsच्या मदतीने 38,000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्सचा अॅक्सेस मिळतो.
Picture Credit:hyundai
World EV Day निमित्त Hyundai EV मालकांसाठी 9 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान कंपनीच्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोफत चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
Picture Credit:hyundai
Hyundai कडे सध्या 2,600+ प्रशिक्षित EV सर्व्हिस कर्मचारी आहेत. FY2026-27 अखेर आणखी 5,000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.
Picture Credit:hyundai
कंपनी 2030 पर्यंत चार्जिंग नेटवर्क वाढवण्यासोबतच EV सर्व्हिस आणि सेल्स नेटवर्कही मजबूत करत आहे. भविष्यात नवीन लोकलाइज्ड मास-मार्केट SUV EV आणण्याचीही Hyundaiची योजना आहे.
Picture Credit:hyundai