दारात काढा पारंपरिक आणि सुंदर रांगोळी डिझाइन

Lifestyle

18 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

गुढीपाडव्याचा सण म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. दारासमोर गुढी उभारून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोणतेही सण रांगोळी शिवाय अपूर्ण आहेत. गुढीपाडव्यानिमित्त रांगोळीच्या सुंदर डिझाईन जाणून घ्या

गुढीपाडवा २०२६

Picture Credit: Pinterest

विविध रंगसंगतीचा वापर करून गुढीची रांगोळी काढता येऊ शकते. ही रांगोळी काढण्यासाठी खूप सोपी आहे.

गुढीची रांगोळी 

Picture Credit: Pinterest

घराबाहेर मोठी जागा असल्यास थोडी मोठी रांगोळी काढता येऊ शकते. यामध्ये गडद रंगांचा वापर केल्यास ही  रांगोळी जास्त उठून दिसेल.

मोठी रांगोळी

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला रांगोळीचे विविध प्रकार येत असल्यास आखीव रेखीव भरीव अशी रांगोळी काढून छान सजवू शकता.

रांगोळी सजावट 

Picture Credit: Pinterest

संस्कृती आणि परंपरा

गुढीपाडव्याला फूल, आंब्याची पाने, कडूलिंबाची पाने याला महत्त्व असते. रांगोळीत आपण या सगळ्याचा वापर केल्यास संस्कृती आणि परंपरेचे दर्शन होते.

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला रांगोळी येत नसेल तर तुम्ही आधी जमिनीवर हवे ते चित्र रेखाटून घ्या. नंतर त्यावर पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर करून त्यात तुमच्या आवडीचे रंग भरा.

रांगोळी येत नसल्यास

Picture Credit: Pinterest

गुढीच्या रांगोळीभोवती दिव्याने सजावट केल्यास चांगला लुक येईल.

दिव्यांची सजावट

Picture Credit: Pinterest

शुभ गुढीपाडवा असा संदेश लिहून तुम्ही सुंदर अशी गुढीची रांगोळी काढू शकता.

गुढीपाडवा संदेश

Picture Credit: Pinterest