गुरुवारी बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या जखाऊ बंदरावर धडकले.
मोरबी, मांडवी, अमरेलीमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस
भुजमध्ये मोठमोठी झाडं उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
मांडवीच्या समुद्रकिनारी खांबच कोसळला.
कच्छमध्ये बांधकामाधीन असलेल्या जहाजाचे नुकसान झाले.
चक्रीवादळाचा वेग इतका होता जुनागडच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या काचा फुटल्या
NDRF च्या 17 आणि SDRF च्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे, तर सुमारे 22 जण जखमी झालेले आहेत.
सखल भागातून 72 नागरिकांचे (पुरुष-32, महिला-25, मुले-15) द्वारका येथील NDH शाळेत स्थलांतर करण्यात आले.