सध्या गुलाबी साडी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.

आता या गाण्याने नवा विक्रम केलाय.

'न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर'वर गुलाबी साडी हे गाणं झळकलं आहे.

पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याला मिळालाय.

या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स होत आहेत.

'हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही,' अशी प्रतिक्रिया संजू राठोड यांनी दिलीय.

गुलाबी साडी गाण्याला 'यूट्यूब'वर 70 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

न्यूयॉर्क टाइम्सवर झळकणारं हे पहिलंच गाणं आहे.