केसांची वाढ होण्यासाठी ट्राय करा घरगुती उपाय

रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने केस आणि टाळूची मालिश करा. रात्रभर तेल ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा.

 कांदा कापून त्याचा रस काढा. मिक्सरमध्येही कांदे बारीक करू शकता. हा रस कापसाच्या मदतीने केसांवर लावा. रस 15 मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवा आणि नंतर केस शॅम्पूने धुवा.

केसांच्या वाढीसाठी दोन ते तीन चमचे जिनसेंग तेल टाळूवर लावून मालिश करा. लावल्यानंतर तेल एक ते दीड तास ठेवा आणि मग केस धुवा.

कोरफड कापून त्यातला गर किंवा ॲलोवेरा जेल केसांवर लावा. जेल लावल्यानंतर एक तासाने आपले केस शॅम्पूने धुवा.

एक वाटी कढीपत्ता आणि एक कप खोबरेल तेल घ्या. कढीपत्ता खोबरेल तेलात गरम करा. नंतर गाळून घ्या आणि तेल थंड होऊ द्या. हे तेल तुमच्या केसांच्या मुळांना मसाज करा. मसाज केल्यानंतर एक तासाने केस धुवा.

एक ते दोन ग्रीन टीच्या पिशव्या उकळत्या पाण्यात ठेवा. काही मिनिटे त्या पिशव्या पाण्यात भिजू द्या. ग्रीन टीच्या पिशव्या बाहेर काढा आणि पाणी थंड होऊ द्या.पाणी थंड झाल्यावर केस ग्रीन टी असलेल्या पाण्याने धुवा.

एक वाटी दही घ्या. कढीपत्ता बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट दह्यामध्ये मिसळा. हे मिश्रण टाळू आणि केसांवर लावा.थोड्या वेळाने शॅम्पूने केस धुवा.

एक कप मेंदी पावडर आणि दही घ्या. दह्यामध्ये मेंदी पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा पेस्ट सुकल्यानंतर केस शॅम्पूने धुवा.

घरगुती उपाय करताना लक्षात ठेवा की, तुम्हाला ज्या घटकामुळे त्रास होत नाही अशा घटकापासून बनवलेल्या गोष्टीच तुम्ही केसांसाठी वापरायला हव्यात.