अनेकांना बाईक किंवा ॲक्टिव्हाच्या हँडलला बॅग लटकवण्याची सवय असते.
Picture Credit:citroen
तुम्हाला ही सवय असेल तर वेळीच बदला. अन्यथा या सवयीमुळे अपघाताचा धोका आणि वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
Picture Credit:citroen
दुचाकीच्या हँडलला बॅग लटकवल्यास बाईकचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Picture Credit:citroen
कायद्यानुसार, धोकादायक ड्रायव्हिंग आणि वाहतुकीत अडथळा आणल्याबद्दल चालकाला दंड होऊ शकतो.
Picture Credit:citroen
कलम १७७ आणि १८४ अंतर्गत अशा चालकांना दंड आकारू शकतात.
Picture Credit:citroen
लटकलेल्या सामनामुळे तुमच्या हातांच्या हालचालींवर मर्यादा येतात आणि वाहनांवरील नियंत्रण धोक्यात येते.
Picture Credit:citroen
या वर्तनामुळे रस्त्यावरील इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांना वाटल्यास पोलीस ५०० ते १ हजार किंवा त्याहून अधिक रक्कमेचे न्यायालयीन ई चलन जारी करू शकतात.
Picture Credit:citroen
बाईक किंवा स्कूटरची रचना गुरुत्वाकर्षण केंद्र अचूक राखण्यासाठी केलेही असते.
Picture Credit:citroen
एखाद्यावेळी बॅगेचे हँडल, दोरी त्यात अडकून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ब्रेक न लागणे. ॲक्सिलरेटर वेगाने पडणे. अशा घटनांमुळे अपघात होऊ शकतो.
Picture Credit:citroen
साईड बॉक्स, सॅडल बॅग किंवा बॅकपॅक वापरू शकता.
Picture Credit:citroen