हरतालिका 18 सप्टेंबरला साजरी करण्यात येत आहे.
हरतालिका व्रताला हरतालिका तीज किंवा तीज असेही म्हणतात.
हरतालिका तीज राजस्थान,मध्य प्रदेश,बिहार,उत्तर प्रदेशमध्ये साजरी केली जाते.
महिला आपल्या वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात.
वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी देवी पार्वतीला श्रृंगाराच्या 16 वस्तू अर्पण करा.
हरतालिका तीजच्या दिवशी पती-पत्नीने केशर दुधाने शिवलिंगाला जलाभिषेक करावा.
हरतालिका तीजच्या दिवशी गायीला हळद भिजवलेली रोटी आणि गुळाची रोटी खाऊ घातल्यास जीवनात सुख-समृद्धी येते, असं मानतात.
हरतालिका तीजच्या दिवशी गरीब मुलींना अन्नदान करून दक्षिणा दिल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतील.
ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी सकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 दिवे लावावेत.