अखंड सौभाग्यासाठी हरतालिकेचा उपवास  स्त्रिया करतात

कठोर तपश्चर्येनंतर पार्वतीने शंकराला प्राप्त केले, हरतालिकेच्या दिवशी शंकराने पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले

तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर हे नियम जाणून घ्या.

तुमच्या समजुतीनुसार व्रताचा संकल्प करा. आयुष्यभर तो पाळावा लागेल.

पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवायचा संकल्प केल्यास तो पूर्ण करा.

या दिवशी मासिक पाळी असल्यास दूरवरून कथा ऐकावी. देवाला स्पर्श कर नये. उपवास मात्र करावा.

हरतालिकेचा उपवास मध्येच सोडता येत नाही, कायम करावा लागतो.

हे व्रत करणाऱ्या महिलांना दुपारी किंवा रात्री झोपण्यास मनाई आहे.

श्रृंगार करून शिव-पार्वतीची पूजा करावी, त्यामुळे शंकर प्रसन्न होतात, मनोकामना पूर्ण करतात.

व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधीनुसार शिव आणि पार्वतीची पूजा करावी.

व्रत सोडल्यानंतर पूजेचं साहित्य, मातीचं शिवलिंग याचे नंतर विसर्जन करावे.