पहिला रंग आहे Antarctic Silver. सिल्व्हर शेडला आकर्षक रेड ग्राफिक्सची जोड देण्यात आली आहे. प्रीमियम आणि स्पोर्टी लूक आवडणाऱ्या रायडर्ससाठी हा रंग खास ठरू शकतो.
Picture Credit:royalenfield
Siberia White हा रंग आपल्या वेगळ्या ग्राफिक्समुळे लक्ष वेधून घेतो. ऑफ-व्हाइट बेससोबत ऑरेंज, यलो आणि रेड रंगांच्या पट्ट्या बाइकला रेट्रो रॅली लूक देतात.
Picture Credit:royalenfield
Viking Bronze मध्ये ब्रॉन्झ आणि ग्रे शेडचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. यावर असलेले डार्क ग्राफिक्स आणि ब्लू अॅक्सेंट बाइकच्या अॅडव्हेंचर लूकमध्ये वेगळीच भर घालतात.
Picture Credit:royalenfield
हिरव्या रंगाची आवड असणाऱ्यांसाठी Aztec Green हा पर्याय आहे. या रंगातील डार्क ग्रीन ग्राफिक्स बाइकला रग्ड आणि दमदार लूक देतात.
Picture Credit:royalenfield
ब्लॅक रंग पसंत करणाऱ्यांसाठी Tectonic Black दिला आहे. काळ्या बॉडीवर रेड आणि यलो ग्राफिक्सची आकर्षक जोड दिसते. हा रंग बाइकला स्पोर्टी लूक देतो.
Picture Credit:royalenfield
Himalayan 750 च्या रंगांमध्ये व्हील सेटअपचाही फरक पाहायला मिळतो. Antarctic Silver, Siberia White आणि Viking Bronze या रंगांसोबत स्पोक व्हील्स दिसतात. तर Aztec Green आणि Tectonic Black मध्ये अलॉय व्हील्स आहेत.
Picture Credit:royalenfield
Himalayan 750 मध्ये 743cc चे पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 55 PS पॉवर आणि 63 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.
Picture Credit:royalenfield
Antarctic Silver, Siberia White, Viking Bronze, Aztec Green आणि Tectonic Black अशा पाच रंगांमध्ये Himalayan 750 सादर करण्यात आली आहे. यापैकी तुम्हाला कोणता रंग सर्वाधिक आवडला?
Picture Credit:royalenfield