पेट्रोल कमी खर्च होण्यासाठी वापरतात हे खास मशीन! बाइकच्या मायलेजशी काय संबंध?

Automobile

17 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

बाइकचे मायलेज कमी झाले असेल, तर Fuel Injector Cleaning Machine उपयोगी ठरू शकते. जाणून घ्या या मशीनचे काम!

बाईकचे Mileage वाढवण्यासाठी वापरतात हे खास मशीन!

Picture Credit:bajajauto

बाईकच्या इंजिनमध्ये पेट्रोल पोहोचवण्याचे काम Fuel Injector करते. ते पेट्रोलचे अतिशय बारीक थेंब करून इंजिनमध्ये फवारते.

Fuel Injector म्हणजे काय?

Picture Credit:heromotocorp

दीर्घकाळ वापरामुळे इंजेक्टरच्या नोजलमध्ये कार्बन आणि इंधनाचे अवशेष जमा होऊ शकतात. त्यामुळे पेट्रोल फवारण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

इंजेक्टरमध्ये घाण कशी साचते?

Picture Credit:bajajauto

हे एक विशेष सर्व्हिसिंग उपकरण आहे. इंजेक्टरमधील जमा झालेली घाण साफ करणे आणि त्याची कार्यक्षमता तपासणे यासाठी याचा वापर होतो.

काय आहे Fuel Injector Cleaning Machine?

Picture Credit:heromotocorp

सर्वप्रथम इंजेक्टर बाइकपासून वेगळे केले जाते. त्यानंतर मशीनला जोडून विशेष क्लिनिंग प्रक्रियेद्वारे त्यातील घाण काढली जाते.

असे केले जाते इंजेक्टर क्लीनिंग!

Picture Credit:bajajauto

काही मशीनमध्ये Ultrasonic Cleaning Technology वापरली जाते. ध्वनी लहरींमुळे क्लिनिंग लिक्विडमध्ये सूक्ष्म बुडबुडे तयार होतात. त्यांच्या मदतीने इंजेक्टरवरील घाण साफ होण्यास मदत मिळते.

अल्ट्रासोनिक तंत्रज्ञानाची मदत!

क्लिनिंगनंतर इंजेक्टरमधून पेट्रोल किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने फवारले जाते, हे तपासले जाते. यामुळे इंजेक्टर व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे समजते.

पेट्रोल फवारणीचीही होते तपासणी!

Picture Credit:bajajauto

इंजेक्टरमध्ये घाण साचल्यामुळे इंधन फवारणी बिघडली असेल, तर स्वच्छतेनंतर ती सुधारू शकते. त्यामुळे इंजिनची कार्यक्षमता आणि मायलेज सुधारण्यास मदत होऊ शकते.

मायलेज वाढण्यास कशी होते मदत?

Picture Credit:heromotocorp

नाही! इंजेक्टर व्यवस्थित काम करत असेल, तर क्लिनिंगची गरज नसते. मायलेज कमी झाल्यास आधी बाइकची योग्य तपासणी करूनच क्लिनिंग करावे.

प्रत्येक बाइकसाठी गरजेचे आहे का हे मशीन?

Picture Credit:heromotocorp