चालणे त्यातही ते पाठमोरे असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत. 

 पाठमोरे चालण्याने शारीरिक, मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे.

नॉर्मल चालण्यापेक्षा पाठमोरे चालण्याने वेगवेगळ्या स्नायूंचा वापर होतो. 

गुडघ्यांच्या सांध्यावरील दबाव कमी होतो, क्वाड्रिसेप्स स्नायू बळकट होतात.

शारीरिक संतुलन सुधारते, पाठमोरं चालण्यासाठी अधिक एकाग्रता लागते.

पाय वारंवार उचलावे लागतात, त्यामुळे तळपायांचे आणि टाचांचे स्नायू मजबूत होतात.

पाठमोरं चालल्याने मणक्याच्या नैसर्गिक रचनेला चालना मिळते. 

अशा प्रकारे चालल्याने शरीरातील बरेच स्नायू मोकळे होतात.