कारल्याचं नाव ऐकताच अनेक जण नाक मुरडतात.

मात्र, अशाप्रकारे भाजी बनवल्यास कारल्याची भाजी कडू होत नाही.

कारल्याचं साल काढूनच त्याची भाजी करावी.

सगळ्यात आधी मिठाच्या पाण्यात कारलं थोडसं उकळून घ्यावं.

उकळवून घेतल्याने कारल्याचा कडवटपणा नाहीसा होतो.

कारल्याची भाजी करताना त्यातल्या बियासुद्धा आठवणीने काढा.

या बियांमध्येचं कारल्याचा कडवटपणा जास्त असतो.

या पद्धतीने भाजी केल्यास ती फारशी कडू लागणार नाही.