दह्यात काय मिसळून खाऊ नये जाणून घ्या.

शरीर हेल्दी राहण्यासाठी आहाराकडे लक्ष द्यायला हवे.

या गोष्टी दह्यात मिसळून खाल्ल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं.

दही खाताना दूध किंवा त्याचे पदार्थ खाऊ नयेत. गॅस आणि अ‍ॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.

दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने एलर्जी, उलटी होण्याची शक्यता आहे.

दही आणि आंबा कधीच एकत्र खाऊ नये. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

दही आणि केळ कधीच एकत्र खाऊ नये, दही खाल्ल्यानंतर सुमारे 2 तासांनी केळं खावे.

दह्यासोबत हे पदार्थ खाल्ल्यास पचनाची समस्या निर्माण होते.